pasha patel in bhivandi bamboo mission rally

ठाणे जिल्ह्यातील बांबू मिशन मेळाव्यांना ‘पाशा पटेल पॅटर्नची’ भुरळ..

हा सूर्य‘ आणि हा जयद्रथ‘; तसाच हा लाभार्थी‘ आणि हा अधिकारी…

ठाणे: बांबू लागवडीसाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सात लाख आणि चार हजार रुपये अनुदान योजना आहे. ह्याच योजनेच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांना महत्त्व पटवून देताना एक आदिवासी शेतकरी उभा राहतो, पाशा पटेल त्याच्याकडून पारंपारिक भात शेतीचे अर्थ गणित समजून घेतात. त्याचवेळी बांबू लागवडीसाठी योजना काय आहे हे समजून सांगण्यासाठी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, बी.डी.ओ. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांना भर सभेत उभे राहून त्यांच्या जबाबदाऱ्या वदवून घेतल्या जातात.. हा शेतकरी ही योजना आणि हा अधिकारी… कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या भर सभेतील या पॅटर्नमुळे पालघर पाठोपाठ ठाण्यातील बांबू मिशन मेळाव्याचा पहिला दिवस चांगलाच गाजला.

oplus_2

पालघर बांबू मिशन मिळावे यशस्वी ठरल्यानंतर दुसऱ्या टप्प्यांमध्ये आज (ता.25 मे ) पासून ठाणे जिल्ह्यातील बांबू मिशन मेळाव्यांना सुरुवात झाली आहे.भिवंडी ग्रामीण आणि शहर भागात आज पाशा पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन मेळावे पार पडले. ग्रामीण भागात दाभाडे या ठिकाणी पार पडलेल्या मेळाव्याला भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, भिवंडी चे तहसीलदार अभिजीत खोले, श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील ग्रामविकास कृषी सामाजिक वनीकरण वन आणि महसूल संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीलाच पाशा पटेल यांनी सभेला उपस्थित असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांपैकी गोपाळ या शेतकऱ्याला व्यासपीठावर बोलावले. यावेळी झालेल्या प्रश्नोत्तरांमध्ये शेतकरी गोपाळ म्हणाला, ‘ साहेब, वीस गुंठ्यातून भात लागवड करून पदरात 18 हजार रुपये मिळाले. हिशोब केला तर पदरात काहीच पडले नाही.

oplus_2

ही एकट्या आदिवासी भागातील गोपाळ नावाच्या शेतकऱ्याची अवस्था नाही तर कोकणपट्टीतील ठाणे असेल किंवा पालघर आदिवासी डोंगरी भागातील प्रत्येक शेतकऱ्याची भात शेती आतबट्ट्याची ठरली आहे, हे सप्रमाण पाशा पटेल यांनी उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले.

आता भात शेती करायची नाही मग काय करायचं ? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यावेळी पाशा पटेल यांनी बांबू लागवडीसाठी तुम्हाला सात लाख चार हजाराचे अनुदान मिळेल हे सांगतात शेतकऱ्यांचे डोळे चमकतात. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत बांबू लागवडीला हे अनुदान मिळते परंतु ते मिळायची मिळवायचे कसे? यावेळी पाशा पटेल उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये ग्रामसेवक किंवा बिडिओला उभे करतात. गोपाळने बांबू लागवड केली तर त्याला तुम्ही सात लाख चार हजार रुपये देणार का? अशा जाहीर प्रश्नावर अधिकारी ‘होय’ याचे उत्तर देतो. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांमध्ये प्रश्नांचं काहूर उठलेलं असतं. मग दुसरा प्रश्न येतो लागवडीसाठी रोपे लागणार त्यासाठी हेक्टरी 40 हजाराचा खर्च आहे. एवढे पैसे शेतकऱ्याकडे नाही मग लागवड होणार कशी? याचे उत्तर देखील बीडीओ देतो की आम्ही शेतकऱ्याला सरकारी खर्चाने घरपोच रोपांचा पुरवठा करू. लागवडीसाठी खड्डे खणावे लागतात त्यासाठी कोण पैसे देणार? हे पैसे देखील योजनेतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. खड्डे झाले लागवड झाली आता खते द्यायची. खतांचा खर्च देखील बांबू लागवडीच्या योजनेमध्ये समाविष्ट आहे. सगळं झाल्यानंतर या लागवडीची राखणदारी करण्यासाठी जर शेतकऱ्याने योजनेतून मस्टरवर नोंद केली तर प्रतिदिन राखण्याची रु. 312 रुपयाची मजुरी देखील लाभार्थी शेतकऱ्याला मिळते. पाशा पटेल आता त्यांच्यासोबत आणलेली एक पिशवी काढतात त्यामध्ये बांबूचा शर्ट असतो टी-शर्ट असतो बांबूपासून बनलेली विविध उत्पादने शेतकऱ्यांना दाखवली जातात. त्याचबरोबर स्वतः परिधान केलेला चष्मा आणि घड्याळ देखील शेतकऱ्यांना दाखवतात.

एक नाहीतर बांबूपासून जवळपास दोन हजार प्रकारच्या वस्तू तयार होतात. बांबूपासून पॅलेट तयार करून वीज निर्मितीसाठी दगडी कोळशाएवजी बांबूचा वापर होतो. बांबू वेगाने वाढणारं गवत आहे. 10X10X10 अंतरावर बांबूची लागवड केल्यानंतर तुमच्या उरलेल्या क्षेत्रांमध्ये मधल्या ओळीमध्ये तुम्ही भात नागली वरई ही पारंपारिक पिके घेऊ शकतात हे सांगितल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो.

oplus_2

बांबू लावण्यासाठी अनुदान मिळते बांबू वाढवण्यासाठी अनुदान मिळते बांबूची उत्पादने विक्री करून तुम्हाला पैसे मिळतात. बांबू हे पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वोत्तम ठीक आहे कारण की बांबूची कार्बन शोषून घेण्याची क्षमता ही सर्वाधिक आहे. मात्र ऑक्सिजन निर्मितीची क्षमता देखील मोठी आहे. वाढते कार्बन उत्सर्जन आणि तापमान रोखण्यासाठी बांबू प्रचंड फलदायी ठरणार आहे.

जवळपास तास दीड तासाचे हे उद्बोधन संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न अजूनही शिल्लक असतील तर त्याचे उत्तर पाशा पटेल यांच्याकडून दिली जातात. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो. आणि अशा खुल्या मंचावरील सभेची सांगता होते. शासकीय पठडीमध्ये कधी न झालेला हा कार्यक्रम अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने पहिलाच अभिनव कार्यक्रम ठरल्याचे सांगितले जाते.

भिवंडीतील आज पहिल्या दिवसाच्या मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी आदिवासी शेतकऱ्यांना मिळालेल्या वनपट्ट्यांमध्ये वनविभागाकडून काहीच होत नाही शेतकरी देखील पलाटं रिकामी ठेवत आहेत. बांबु लागवडीची योजना आणि महत्व पटवून दिल्यामुळे अविकसित भिवंडी ग्रामीण चा निश्चितपणे बांबू लागवडीतून विकास साधला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

श्रमजीवी संघटनेचे रामभाऊ पारवा यांनीही पलाटं वाचवण्यासाठीच बांबू लागवड आवश्यक असल्याचे यावेळी प्रतिपादित केले. शांताराम भोईर यांनी तीन हजार शेतकऱ्यांनी दहा ते पंधरा लाख बांबू लागवड करावी असा संकल्प मांडला.

oplus_2

दिनांक 25 ते 28 दरम्यान होणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील बांबू मिशन मेळाव्यामध्ये उद्या शहापूर, मुरबाड त्यानंतर टिटवाळा, वांगणी पाचवड आणि वर्सावे असे उर्वरित ठाणे जिल्ह्यांसाठी बांबू मिशन मिळावे पार पडणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *