Great People Are Not to Be Celebrated…

डॉ. नानासाहेब थोरात  |  Dr. Nanasaheb Thorat

इंग्लंडमध्ये लंडन पासून शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावर “Stratford-upon-Avon” हे छोटेसे गाव आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे ते शेक्सपियरचे जन्मगाव आहे. एव्हॉन नदीच्या किनारी वसलेले हे गाव चित्रात रेखाटल्यासारखे सुंदर, स्वच्छ आणि निसर्गरम्य आहे.

About a hundred to a hundred and fifty kilometres from London lies the small English village of Stratford-upon-Avon — Shakespeare’s birthplace. Nestled on the banks of the River Avon, it is pristine, picturesque, and serene, as if lifted straight from a painting.

गावात एका बाजूला शेक्सपियरचे जुने घर जतन करून ठेवले आहे. त्याच्या शेजारी एक छोटेसे संग्रहालय आहे. त्याच रस्त्यावर शेक्सपियरचा पुतळा आहे आणि नदीकिनारी त्याच्या नावाचे नाट्यगृह आहे. दरवर्षी जगभरातून सुमारे २७ लाख पर्यटक या गावाला भेट देतात. विशेष म्हणजे, हे गाव सोडल्यास ब्रिटनमधील इतर शहरांमध्ये शेक्सपियरचे पुतळे फारसे दिसत नाहीत.

One side of the village preserves Shakespeare’s old home, alongside a modest museum. A statue stands on the same street, and a theatre bearing his name sits by the riverside. Nearly 2.7 million tourists visit this village every year from across the world. Remarkably, outside this village, one rarely encounters statues of Shakespeare anywhere else in Britain.

University of Oxford मधील प्रयोगशाळेत माझ्याकडे एक मेडिकलचा विद्यार्थी — मूळचा जर्मन पण सगळं शिक्षण लंडनमध्ये झालेले — सहा महिन्यांच्या संशोधन प्रकल्पासाठी आला होता. एके दिवशी तो नोटबुकमध्ये काहीतरी लिहित होता. लिहून झाल्यावर तो सुटकेचा नि:श्वास टाकत म्हणाला, “एकदाचं शेक्सपियरपुराण संपलं!”

At my laboratory in the University of Oxford, a German-born medical student who had received all his schooling in London arrived for a six-month research project. One day he was writing something in his notebook. When he finished, he let out a sigh of relief and said, “At last, the Shakespeare ordeal is over!”

कुतूहलाने विचारल्यावर त्याने सांगितले की त्यांना दर आठवड्याला मेडिकल निबंध लिहावा लागतो आणि तो शेक्सपियरच्या शैलीत लिहिला तरच चांगले गुण मिळतात. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो: “शेक्सपियरची इंग्लिश म्हणजे नेमकी कोणती?” पुढील दोन तास त्याने मला त्याबद्दल सविस्तर माहिती दिली.

Curious, I asked him to explain. He said they were required to write a medical essay every week, and good marks came only if it was written in Shakespeare’s style. I was astonished. “What exactly is Shakespeare’s English?” He spent the next two hours explaining it to me in detail.

एक मेडिकलचा विद्यार्थी असूनही त्याला एवढे कसे माहिती, असे विचारल्यावर तो म्हणाला, “फक्त मलाच नाही, माझ्या सगळ्या मित्रांनाही हे माहिती आहे. आम्हाला हे शाळेतूनच शिकवले जाते.” नंतर माझा मुलगा तिथल्या शाळेत जाऊ लागल्यावर मला जाणवले की तेथे शिकवले जाणारे इंग्लिश खरोखरच वेगळे आणि समृद्ध आहे.

When I asked how a medical student came to know so much, he replied, “Not just me — all my friends know this too. We are taught this from school itself.” Later, when my own son started attending school there, I realised that the English taught in those classrooms was indeed richer and more distinctive.

जसे ‘शोले’च्या आधी आणि नंतरचे बॉलिवूड किंवा ‘बाहुबली’नंतर बदललेला दक्षिण भारतीय सिनेमा, तसेच शेक्सपियरच्या आधीची आणि नंतरची अशी इंग्लिश भाषेची विभागणी करता येते. सर्वसामान्यांना समजेल अशी वाक्यरचना आणि सुमारे दोन हजार नवीन शब्द शेक्सपियरने इंग्लिश भाषेला दिले आणि तिला समृद्ध केले.

Just as Bollywood is divided into pre-Sholay and post-Sholay eras, or South Indian cinema into before and after Baahubali, English literature can be divided into before and after Shakespeare. He gave the language simple, widely accessible syntax, and contributed nearly two thousand new words that enriched it immeasurably.

आज जगभरात इंग्लिशचा जो प्रसार झाला, किचकट इंग्लिश कोट्यवधी लोकांची बोलीभाषा झाली, ती जी लिहली आणि बोलली जाते त्याचे बरेसचे श्रेय शेक्सपियरला जाते. सगळ्या जगाला इंग्लिश भाषा बोलायला लावणाऱ्या शेक्सपियरच्या नावाने ब्रिटनमध्ये ना विद्यापीठ आहे, ना पुतळे आहेत, ना रस्ते आहेत — एवढेच काय तर शाळा पण नाहीत. पण त्याच इंग्रजांनी शेक्सपियर मात्र जगात पोहोचवला.

Much of the credit for the global spread of English — a language that billions now speak as their own — belongs to Shakespeare. Yet the British have not named universities, statues, streets, or even schools after him in any significant way. And yet, it is the English themselves who carried Shakespeare to every corner of the world.

न्यूटनच्या आधीपण झाडावरून फळ खाली पडत होती, समुद्राला भरती ओहोटी येत होती, पण त्याने या दोन्ही नैसर्गिक क्रिया एकाच नियमाने होतात हे गणितीय पद्धतीने सिद्ध करून दाखवले. इंग्रज हा शोध जगाच्या प्रत्येक विज्ञानाच्या पुस्तकात घेऊन गेले आणि त्यावर पुढील संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला.

Before Newton, fruits had always fallen from trees and the ocean had always ebbed and flowed. But Newton proved mathematically that both these natural phenomena were governed by the same law. The English took this discovery to every science textbook in the world and funded further research on a large scale.

रस्त्यावरच्या सायकलपासून ते अवकाशातील रॉकेटपर्यंत न्यूटनच्या नियमात बंध आहेत. पण त्या न्यूटनचे कुठे पुतळे नाहीत, की रस्ते नाहीत, फ्लेक्स नाहीत, ना त्याच्या नावाचं विद्यापीठ आहे — पण तो माहित नाही असा एकसुद्धा शाळेतील विद्यार्थी नाही. तीनशे-चारशे वर्ष तो जगाच्या ओठावर आहे आणि पुढे शेकडो वर्षे राहील.

From the bicycle on the street to the rocket in space, Newton’s laws govern them all. Yet there are no statues of Newton, no roads named after him, no flex banners, no university bearing his name — and yet not a single schoolchild in the world remains unaware of him. He has lived on people’s lips for three to four centuries, and will continue to do so for centuries more.

न्यूटनचे नियम सगळ्याच परिस्थितीत लागू पडत नाहीत हे आईन्स्टाईनने सांगितले. तो आईन्स्टाईन आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आईन्स्टाईनचे सगळंच संशोधन काही बरोबर नव्हते पण तो चुकीचा आहे हे सिद्ध करायलासुद्धा युरोप-अमेरिकन शास्त्रज्ञांना कोट्यवधी डॉलरचा निधी दिला — त्याचे नावाचे रस्ते बांधायला नव्हे.

Einstein demonstrated that Newton’s laws did not apply in all situations — and that same Einstein has now reached every corner of the globe. Not all of Einstein’s research was correct, but European and American scientists received billions of dollars in funding just to prove where he was wrong — not to build roads named after him.

युरोप, अमेरिका, जपान आणि अलीकडे चीनमध्येही अशा अनेक उदाहरणांतून एक गोष्ट स्पष्ट दिसते — व्यक्तीची गुणवत्ता ओळखून त्यांच्या कार्याला पुढील पिढ्यांनी जगभर पोहोचवले. शेक्सपियरबद्दल काही इंग्रज टीका करतात, तरी त्याच्या भाषेतील योगदानाला कोणी नाकारत नाही. न्यूटन आणि आईन्स्टाईनबाबतही हेच लागू पडते.

From Europe and America to Japan and increasingly China, one truth emerges from countless examples: successive generations recognised greatness in individuals and carried their work across the world. Some English people may criticise Shakespeare, but none can deny his contribution to the language. The same holds for Newton and Einstein.

त्या देशातील लोकांनी या प्रतिकांना रस्त्यावरच्या फ्लेक्समध्ये, दगडी भिंतीत बंद नाही करून ठेवले. त्या देशातील ९९% लोकांना त्यांचे जन्म-मृत्यू दिवस पण माहित नसतील. या लोकांना नावाने बोलावले की अरेतुरे बोलवले, तिथल्या जनतेला काही फरक पडत नाही.

People of those nations did not imprison their icons in flex banners or stone walls. Ninety-nine percent of their population may not even know these figures’ birth or death dates. Whether they are addressed by first name or surname makes no difference to anyone there.

ते लोक महान व्यक्तींनासाजरेकरत नाहीतते त्यांनाजिवंत ठेवतात“.

They do not “celebrate” great people… they keep them alive.

आपण मात्र आपल्या प्रेरणादायी व्यक्तींना त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथींमध्येच मर्यादित ठेवतो. त्यांनी काय केले, त्यांचे खरे कर्तृत्व काय होते यापेक्षा ते कधी जन्मले आणि त्या दिवशी आपण त्यांना कसे साजरे करायचे — यालाच अधिक महत्त्व दिले जाते.

We, however, limit our inspirational figures to their birth and death anniversaries. Instead of asking what they did and what their true contribution was, we are more concerned about when they were born and how we should celebrate that day.

शेकडो वर्षांपूर्वी डोंगरदऱ्यात राहून ते कसे लढले, कागद-शाईचा गंध नसताना पिढीजात कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशी सहजपणे पाठवली, आधुनिक वैद्यकीय संसाधने नसताना कसे आजार ओळखले आणि बरे केले — हे जगासमोर न आणता आपण त्या लोकांच्या वैयक्तिक आयुष्याचे पोवाडे गात बसतो.

How they fought in mountain valleys centuries ago, how they passed down generational arts from one generation to the next without pen or paper, how they diagnosed and healed illness without modern medicine — instead of bringing this before the world, we sit and sing ballads about their personal lives.

त्या लोकांच्या वैयक्तिक आयुष्याला रस्त्यावर नाचवून त्यांचं खरं कर्तृत्व अंधारात दडपून ठेवतोय. आज ती पिढी या जगात नाही — त्यांच्या वैयक्तिक आयुष्याने आपल्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का? पण त्यांच्या कर्तृत्वाने पडतो ना?

We parade their personal lives in the streets while smothering their true legacy in darkness. That generation is gone from this world — will the details of their personal lives make any difference to ours? But their work — does that not make a difference?

आईन्स्टाईनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किती जणांना माहिती आहे? पण त्याच्या संशोधनाचा परिणाम मात्र संपूर्ण जगावर झाला आहे. त्याच्या काही संकल्पनांमुळे, ज्या अजून पूर्णतः सिद्धही झालेल्या नाहीत, विज्ञानाच्या नवीन शाखांचा जन्म झाला आणि त्याचा प्रभाव वैद्यकशास्त्र, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रावरही पडला.

How many people know the details of Einstein’s personal life? Yet the impact of his research has touched the entire world. Some of his concepts — not yet fully proven — gave birth to new branches of science and influenced medicine, technology, economics, and sociology.

पंधरा सेकंदांच्या रिल्समधून मिळालेल्या माहितीच्या मायाजालात आजची पिढी अडकून पडली आहे. बेधुंद होऊन उधळलेल्या शर्यतीच्या बैलासारखी ही खरी-खोटी माहिती मनामनांत द्वेषाची धूळ उडवत पुढे चालली आहे. माहिती वाढली आहे, पण समज कमी झाली आहे; आवाज वाढला आहे, पण विचार कमी झाले आहेत.

Today’s generation is trapped in the labyrinth of information delivered in fifteen-second reels. Like a frenzy of bulls at a race, this torrent of half-truths and falsehoods charges forward, kicking up clouds of hatred into every mind. Information has grown but understanding has shrunk; noise has increased but thought has diminished.

ज्या समाजात कर्तृत्वापेक्षा व्यक्तिपूजा मोठी होते, तिथे प्रगती खुंटते. व्यक्ती काळाच्या पडद्याआड जाते, पण तिचे विचार आणि कार्य शतकानुशतके जिवंत राहतात. शेक्सपियर, न्यूटन, आईन्स्टाईन यांना आजही जग ओळखते, कारण त्यांच्या नावाभोवती कृत्रिम गजर उभा केला गेला नाही; त्यांच्या कार्याभोवती ज्ञानाची परंपरा उभी राहिली.

In a society where personality cult overshadows achievement, progress stagnates. The person disappears behind the curtain of time, but their ideas and work live on for centuries. Shakespeare, Newton, and Einstein are still known to the world not because artificial fanfare was built around their names, but because a tradition of knowledge was built around their work.

स्मारकांपेक्षा मूल्ये, घोषणांपेक्षा कृती आणि उत्सवांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ असते, हे जेव्हा व्यक्तिपूजेत अडकलेल्या, ‘ब्रेन रॉट’च्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पिढीला उमगेल, तेव्हाच पुढच्या पिढीच्या हाती काहीतरी खरं पोहोचेल. नाहीतर आपण इतिहासाचे वारसदार राहणार नाही, फक्त त्याचे घोषणाबाज प्रेक्षक बनून राहू.

The day the generation standing on the threshold of ‘brain rot’, entangled in personality worship, realises that values surpass monuments, action surpasses slogans, and knowledge surpasses festivals — only then will something real reach the hands of the next generation. Otherwise, we shall not remain the heirs of history; we shall only be its slogan-chanting spectators.

कविता · Verse ✦

कवी दि. पु. चित्रे  |  Poet D. P. Chitre

देवा, ह्याही देशात पाऊस पाड

जिथे माणसांचं खत घालून समाज उगवतात

जिथे बळी जाणारे तुझ्यावर विश्वास ठेवतात

आणि बळी घेणारे तुझेच अवतार असतात…

Lord, let rain fall upon this land too —

Where societies are grown using human beings as fertiliser,

Where the sacrificed still place their faith in you,

And those who take the sacrifice claim to be your avatars…

कृषी परिवार | krishiparva.in

Nanasaheb Thorat

Dr. Nanasaheb Thorat is an internationally recognized Indian scientist, researcher, and author. He serves as an Associate Professor in the Department of Physics at University of Limerick and is jointly affiliated with the Bernal Institute and the Limerick Digital Cancer Research Centre.

His research focuses on:

Cancer Nanomedicine
Magnetic Nanoparticles
Gold and Lipid Nanoparticle Systems
Magnetic Field and Light-Activated Cancer Therapies
Next-Generation 3D Cancer Cell Spheroid Models
Theranostics and Personalized Medicine
International Recognition

Dr. Thorat is a three-time recipient of the prestigious Marie Curie Fellowships:

Politechnika Wrocławska (2018–2020)
University of Oxford (2020–2022)
Harvard Medical School / Queen's University Belfast Marie Curie Global Fellowship (2022)

He is also the first Indian recipient of the European Commission’s Innovation Radar “Grand Prix of the Innovation Radar Prize 2020.”

Academic & Research Contributions
125+ Publications
95 Peer-Reviewed SCI Research Papers
7 Books
25 Book Chapters
1 European Patent Filed
2 Registered European Innovations
Research Funding Exceeding €1.5 Million

Dr. Thorat has delivered keynote speeches and invited talks at prestigious international scientific conferences across the USA, Germany, France, Ireland, Poland, South Korea, Singapore, Japan, and India.

Leadership & International Collaborations

He serves as:

Management Committee Member nominated by the Government of Ireland for
EU COST Action CA23132
Working Group Member for:
EU COST Action CA22118
EU COST Action CA22103
Author of Krishiparva

Krishiparva reflects his vision of connecting science, rural development, and agriculture. Through this work, he emphasizes the role of scientific thinking in transforming rural India and inspiring young minds from farming communities.

Inspirational Thought

“Great people are not meant merely to be celebrated…
They are meant to be kept alive through their ideas, values, and work.”

Dr. Nanasaheb Thorat’s journey—from a rural background in India to global scientific recognition—stands as an inspiring example of knowledge, perseverance, and service to humanity.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *