ट्रम्प टॅरिफचा फटका मराठी शेतकऱ्यांना, मीडिया दाखवतो?” पी. साईनाथ


“अभिव्यक्तीचा नाही, अभिव्यक्तीनंतरच्या स्वातंत्र्याचा प्रश्न!

ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक पी. साईनाथ यांचं आजचं मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार दिन कार्यक्रमातील भाषण उपस्थित पत्रकारांना वेगळा विचार करायला लावणारं ठरलं. “बोलण्याच्या स्वातंत्र्यापेक्षाही आता बोलल्यानंतरच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उद्भवत आहे. बोलल्यानंतर काय होईल?” असं विदारक वास्तव त्यांनी मांडलं.

उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचं राजकारण पटत नाही, पण मी मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंना पाठिंबा, असं का ते बोलले? भाषणात ऐकाच.

त्यांनी आता मीडिया आणि पत्रकारिता असे दोन वर्ग झाले असल्याची मांडणी केली. जे चांगली पत्रकारिता करतात, ते पत्रकार आजही आहेत, हे पुरस्कार मिळालेल्यांवरून दिसतं. पण त्याचवेळी एक वर्ग फक्त मीडिया असाच उरला आहे, ज्याचा खरा धंदा रिअल इस्टेट वगैरे आहे. तो फोर्थ इस्टेट नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफचा फटका बसणाऱ्यांमध्ये कापूस, सोयाबीन उत्पादक मराठी शेतकरीही आहेत. मात्र टॅरिफचा शेतकऱ्यांना बसणारा फटका मीडिया किती दाखवतो, असा रोखठोक प्रश्नही त्यांनी विचारला.

पी. साईनाथ यांचं संपूर्ण व्याख्यान


https://youtube.com/live/fb9XfKZUcTg?feature=share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *