बई काळा घोडा फेस्टीव्हल मधे बांबू लेडी मिनाक्षी वाळके यांची राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी भेट घेतली. यावेळी मिनाक्षी वाळके यांनी स्वलिखीत बांबू रे बाबू कवितासंग्रह भेट देऊन "अभिसार इनोव्हेटिव्ह" हा बांबू कलेतून महीला सक्षमीकरणाचा सामाजिक सूक्ष्म उद्योगाची माहिती दिली.

`बांबू मॅन ऑफ इंडीया`ने बांबू लेडीच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप….

मुंबई ता.2 ः महाराष्ट्रातील दुर्गम चंद्रपुर जिल्ह्यातील सावरगाव ता.नागभीड येथे विटभट्टीवर जन्मलेल्या बांबू लेडी मिनाक्षी मुकेश वाळके यांच्या बांबू आधारीत   “अभिसार इनोव्हेटिव्ह” हा बांबू कला महिला सक्षमीकरणाचा सामाजिक सूक्ष्म उद्योग आता जगाच्या व्यासपीठावर पोचला आहे. त्यांच्या या प्रयत्नांचे कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष बांबू मॅन ऑफ इंडीया पाशा पटेल यांनी मुंबईत काळा घोडा फेस्टीवलमधे भेटून कौतुक केले. बांबू मॅन आणि बांबू लेडी यांच्या भेटीमधे बांबू क्षेत्रातील अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांवर  सखोल चर्चा झाली.

ग्रामीण भागातून संघर्ष करत मुंबईतील काळा घोडा फेस्टीवल पर्यंत प्रवास करणाऱ्या मिनाक्षी यांच्या कलाकृती आणि जीवनसंघर्ष ऐकून पाशा पटेल यांनी या भेटीत आश्चर्य आणि् अभिमान व्यक्त केला. पाशा पटेल म्हणाले, मिनाक्षी वाळके यांचा प्रवास निश्चितपणे स्फुर्तीदायक आहे. स्वतः प्रशिक्षण घेऊन बांबूची उत्पादने निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितपणे प्रशंसनीय आहे.”अभिसार इनोव्हेटिव्ह” ही त्यांची संस्था महीला सक्षमीकरणामधे काम करत आहे. या संस्थेला कॉर्पोरेट आणि शासकीय स्थरावरुन निश्चितपणे आवश्यक सर्व मदत करण्यात येईल.

यावेळी आपली संघर्षगाथा कथन करताना मिनाक्षी वाळके म्हणाल्या, माझ्या हातून स्वतःचे आणि सुमारे ११०० हून अधिक महिलांच्या जीवनाचे सोने झाले. ‘बीआरटीसी’ या शासकीय संस्थेतून ७० दिवसांचे जुजबी प्रशिक्षण आटोपून २०१८ पासून मीनाक्षीचे ‘मिशन आत्मनिर्भर नारी प्रवास सुरू झाले. सुरुवातीला बांबू राखीत नवलाई आणण्याचा प्रयत्न केला. जागतिक दर्जाच्या सौंदर्य स्पर्धेसाठी बांबूचे मुकुट बनवून दिले.  बांबूतून कलात्मकतेचा नवा शोध घेऊन पकिट बेंच, तोरण, फ्रेंडशिप बैंड, दागिने यात वेगळे प्रयोग केले.बांबूतून भारताचा पहिला ‘क्युआर कोड स्कॅनर’ बनवला. हे सारे करत असताना कधी पालघरच्या वारली आदिवासी महिला तर कधी नक्षलग्रस्त भामरागडसारख्या भागातील माडिया, गोंड महिला यांना आपले कौशल्य शिकविले. भूतान आणि बांगलादेशच्या सीमेवर वीरभूम जिल्ह्यात क्लस्टरच्या ३५० महिलांना आत्मनिर्भर केले. चार राज्यांत भटकंती करून सुमारे ११०० हून अधिक वंचित आदिवासी महिलांच्या उपजीविकेची गुरुकिल्ली दिली आहे.

पाशा पटेल यांना भेटून ऊर्जा मिळाली आहे. निश्चितपणे हे काम पुढे नेताना पाशा पटेल यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन कामी येईल अशी भावना मिनाक्षी वाळके यांनी व्यक्त केली. 

हरीत महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकारने २१ लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे उद्दीष्ठ निश्चित केले आहे. बांबूच्या वापराने मानव जात संरक्षीत होणार आहे. बांबू लागवडीतील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ आणि बांबू आधारीत प्रक्रीया उद्योगाच्या उभारणातील रोजगाराच्या संधी निर्माण होत आहे.”अभिसार इनोव्हेटिव्ह” ही त्यांची संस्था महीला सक्षमीकरणासाठी निश्चितपणे पाठबळ दिले जाईल असे पाशा पटेल यांनी यावेळी आश्वासीत केले.

कोण आहे बांबू लेडी ?

मिनाक्षी मुकेश वाळके या खेडेगावात विट भट्टीवर जन्मलेल्या महिलेने “अभिसार इनोव्हेटिव्ह” हा बांबू कलेतून महीला सक्षमीकरणाचा सामाजिक सूक्ष्म उद्योग सूरु केला. 2018 मध्ये शासकीय योजनेतून दोन महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन मिळालेल्या पारंपारीक औजारांच्या साह्याने फक्त 50 रुपये खर्च करून हा उद्योग उभा केला. तो आता साता समुद्रापार पोहोचला असून फक्त बारावी पर्यंत शिकलेल्या मिनाक्षी यांनी कुठल्याही मदातिविना 5 देशांत त्यांच्या जग प्रसिद्ध बांबू राख्या एक्सपोर्ट केल्या. एवढेच नव्हे स्वीडन च्या एका होटेल साठी की-चेन आणि आंतरराष्ट्रीय ब्युटी काँटेस्ट साठी बांबू चे मुकुट (क्रॉऊन) बनविणाऱ्या त्या पहिल्या कारागिर ठरल्या. त्यांनीं 5 नवे डिझाईन बांबू क्षेत्राला दिल्या. भारताचा पहिला बांबू क्यू आर कोड स्कॅनर बनवून त्या विश्व प्रसिद्ध झाल्या. 6 वर्षात त्यांनीं 4 राज्यातील 1100 पेक्षा जास्त महिलांना बांबू कलेतून आत्मनिर्भर केले आहे. इंग्लंड च्या हाउस ऑफ कॉमन्स मध्ये पुरस्कृत त्या पहिल्या महीला बांबू कलावंत असुन त्यांच्या कलाकृती इंग्लंड च्या भारतीय दूतावासात ठेवलेल्या आहेत. “कोण होणार करोडपती” मध्ये सेलिब्रिटी गेस्ट हा बहुमान मिळविणाऱ्या त्या पहिल्याच बांबू कलावंत असुन त्यांनीं अलीकडेच भारताचा पहिला स्वतंत्र बांबू कविता संग्रह प्रकाशित केला आहे.

मुंबई काळा घोडा फेस्टीव्हल मधे बांबू लेडी मिनाक्षी वाळके यांची राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी भेट घेतली. यावेळी मिनाक्षी वाळके यांनी स्वलिखीत बांबू रे बाबू कवितासंग्रह भेट देऊन “अभिसार इनोव्हेटिव्ह” हा बांबू कलेतून महीला सक्षमीकरणाचा सामाजिक सूक्ष्म उद्योगाची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *