मराठी: आजच्या काळात सोशल मीडिया म्हणजे केवळ ‘टाईमपास’ किंवा आभासी जगात हरवून जाण्याचे साधन मानले जाते. ‘विज्ञान: शाप की वरदान’ या जुन्या निबंधासारखीच आज सोशल मीडियाची स्थिती आहे. पण याच तंत्रज्ञानाचा वापर करून जेव्हा एखादा तरुण समाजाची पिढी घडवतो, तेव्हा खऱ्या अर्थाने ‘सामाजिक परिवर्तनाचा सिद्धांत’ प्रत्यक्षात उतरताना दिसतो.
English: In today’s digital age, social media is often dismissed as a mere distraction or a tool to get lost in a virtual world. Much like the classic debate of “Science: A Boon or a Curse,” the impact of social media depends entirely on its user. However, when a young individual utilizes this technology to shape the future of a generation, we witness the ‘Theory of Social Transformation’ in action.

मराठी: विदर्भाच्या मातीतला, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला ‘राजरत्न हिरवाळे’ आज जर्मनीमध्ये स्थायिक आहे. पण तो तिथे केवळ स्वतःचे करिअर करत नाही, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षण, नोकरी आणि फेलोशिपबाबत मोफत मार्गदर्शन करतो. महाकारुणिक गौतम बुद्ध म्हणतात, “अत्त दीपो भव” (स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा). राजरत्न स्वतः प्रकाशाचा स्रोत बनला आणि आता इतरांच्या आयुष्यातील अंधार दूर करत आहे.
English: Hailing from the heart of Vidarbha and educated in a Zilla Parishad school, Rajratna Hirwale is now well-settled in Germany. But his mission goes beyond his personal career. Through social media, he provides free mentorship to thousands of Indian students regarding international education and global job opportunities. Following Lord Buddha’s teaching, “Atta Deepo Bhava” (Be a lamp unto yourself), Rajratna has become a beacon of light, dispelling the darkness of ignorance for many.
मराठी: काय आहे सामाजिक परिवर्तनाचा सिद्धांत?
सामाजिक परिवर्तन म्हणजे केवळ बाह्य बदल नव्हे, तर समाजाच्या विचारसरणीत आणि मूल्यांत झालेला गुणात्मक बदल. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या प्रगतीसोबतच संपूर्ण समूहाच्या उत्थानाचा विचार करते आणि जुन्या, कालबाह्य रूढींऐवजी तर्कनिष्ठ मार्गाचा अवलंब करते, तेव्हा समाजाचे चक्र परिवर्तनाकडे फिरू लागते. राजरत्नची ही कृती याच सिद्धांताचे जिवंत उदाहरण आहे.
English: What is the Theory of Social Transformation?
Social transformation is not just a superficial change; it is a qualitative shift in a society’s mindset and core values. When an individual prioritizes collective upliftment alongside personal success and chooses rational progress over outdated traditions, the wheels of society begin to turn toward true evolution. Rajratna’s efforts are a living manifestation of this theory.
मराठी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” पण आजच्या जागतिक युगात हे शिक्षण जागतिक दर्जाचे असणे गरजेचे आहे. राजरत्नने “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या महामंत्राला नव्या आधुनिक रूपात मांडले आहे—’शिका, डिजिटल माध्यमातून कनेक्ट व्हा आणि प्रगती करा!’

English: Dr. Babasaheb Ambedkar famously said, “Education is the milk of a tigress, and he who drinks it will not stop roaring.” In this globalized era, it is essential that this education meets international standards. Rajratna has reimagined the powerful mantra of “Educate, Organize, and Agitate” for the modern age: “Educate, Connect via Digital Platforms, and Progress!”
मराठी: आज सकाळी मुंबई विमानतळावर एक वेगळेच दृश्य दिसले. एकीकडे उन्हात अनवाणी चालणारा तरुणांचा जत्था होता, तर दुसरीकडे राजरत्नला भेटण्यासाठी आलेले सुशिक्षित तरुण. तुम्हाला अनवाणी पायाने कशाच्या तरी मागे धावायचे आहे, की राजरत्न सारख्या ‘रत्ना’चा हात धरून विज्ञानाच्या जोरावर जगावर नाव कोरायचे आहे? निर्णय सर्वस्वी तुमचा आहे.
English: This morning at the Mumbai airport, a striking contrast was visible. On one side, a group of youths walked barefoot in the scorching sun for a traditional pilgrimage, while on the other, motivated youngsters gathered to welcome a man bringing global knowledge. The choice is yours: do you want to chase the unknown barefoot, or hold the hand of a ‘gem’ like Rajratna to conquer the world with science and intellect?
Connect with Rajratna Hirwale:
Facebook: https://www.facebook.com/share/1EX1rBZGY3/
YouTube: http://youtube.com/0_
जय भीम! जय संविधान! जय परिवर्तन!
Jai Bhim! Jai Samvidhan! Jai Parivartan!
— Vijay Gaikwad, Mumbai.

