नैसर्गिक संकटाबरोबरच सरकारी धोरणाने बेजार झालेल्या शेतकऱ्यानं मोठ्या उमेदीने यंदा लवकर झालेल्या पावसावर पेरणी केली. पण यावेळी हजारो हेक्टर क्षेत्रावर बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्याची वाट लागली. राज्यातील कास्तकऱ्यांची ही व्यथा आज आमदार राजेश बकाने यांच्या लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विधानसभेच्या पटलावर आली खरी.. एक तास चर्चा झाली.. कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल बोगस बियाणे वरून आक्रमक झालेल्या आमदारांचे समाधान करू शकले नाही. आमदार भास्कर जाधव, हरीश पिंपळे, रणधीर सावरकर हे आमदार देखील यावेळी आक्रमक झाल्याचे दिसून आले .बोगस बियाणे विरोधी कायदा गेला कुठे? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? कंपनीवर गुन्हा का दाखल केला नाही? अशा प्रश्नांच्या सरबतीने राज्यमंत्रीपुरते गांगरून गेले अखेर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोगस बियाणे वरील लक्षवेधी राखून ठेवण्याची विनंती केली. तालिकाध्यक्षांनी मान्य केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्य सरकारची एक प्रकारे मोठी नामुष्की मंगळवारी विधानसभेच्या कामकाजात दिसून आली.
पहा कशी झाली विधानसभेत बोगस बियाणावर एक तासाची चर्चा

