सुनील चौधरी — निधड्या छातीचा योद्धा
A Cinematic Life Journey · Parner Taluka, Maharashtra
From the sacred soil of Parner — a boy raised without fear, tempered by fire, transformed into a fearless warrior for justice, society, and the forgotten farmer.
✦
10
Years of Battle
17
Writ Petitions
₹3500Cr
Factory Saved
16K
Members Protected
20
Cases in 30 Days
The Journey
From village roots to a warrior’s destiny
Born of Sacred Soil
Diksal village, Parner Taluka — birthplace of Senapati Bapat, blessed by the legacy of Maharshi Parashar Rishi. Father an MSEB engineer. The real architect of Sunil’s character: grandfather Kondiba Rama Chaudhary — unopposed Sarpanch for 15 years.
डिकसळ · पारनेर तालुका · जन्मभूमी
🌅
Origin
🌾
The Grandfather’s Academy
Markets · Courtrooms · Well-blasting · 5km pipelines · 50 acres farmed. One philosophy: “Never depend on anyone.” 70% of the man was built here.Foundation
AgriCos Brotherhood
Agriculture College, Pune. SBI campus selection — rejected for father’s dream. M.Sc. Agriculture at Rahuri. MPSC–UPSC preparation. More than degrees, Pune gave a brotherhood spanning Maharashtra’s administration, politics and governance.
अँग्रिकॉस स्पिरीट · पुणे कृषी महाविद्यालय
🎓
Youth
🤝
Unity That Spans a State
Agriculture Minister Datta Mama Bharane acknowledged AgriCos spirit before CM Devendra Fadnavis at MPKV Rahuri convocation. A network that would later save his life.AgriCos Forever
When the Sky Fell
Both father’s kidneys failed. COVID forced return from Pune. Family disputes. Chulte separated. Bhaubandhaki arrived. Then ultimate betrayal: murder contracts placed using his own money by those he had financially supported.
किडन्या फेल · भाऊबंदकी · हत्येची सुपारी
⚡
The Storm
🔥
20 Cases. One Month.
With IPS Senior Abhishek Deshmukh Sir and police colleagues — entire criminal network dismantled. 20 FIRs in 30 days. Key accused externed from Nagar district.Fearless Response
The Legal Warrior
₹3,500 crore Parner Sugar Factory — looted and destroyed. 20 senior lawyers refused to fight in High Court. Sunil’s decision: “We will become lawyers ourselves.” 10 years. 17 Writ Petitions. Final stage reached.
पारनेर साखर कारखाना · १७ रिट पिटिशन्स
⚖️
Legal Battle
🏛️
Judicial Accountability — First in Taluka
Locus Standi resolved · Charity Commissioner registration · 7/12 for 16,000 members · Judges’ errors placed on record · Bails cancelled. History made.10 Years · 17 Writs
Abducted for Justice
₹110 crore Devsthan land — illegally seized, illegal liquor trade running, defying High Court orders. As trustee Sunil fought back. Retaliation: abducted from Chief Officer’s cabin at Parner Nagar Panchayat — threatened with death.
११० कोटी देवस्थान जमीन · अपहरण · धमकी
🛡️
Danger
💪
Fear Was Never Taught
Police alertness saved his life. But what saved his spirit? Grandfather never taught fear — so fear never found him. The taluka’s reign of terror collapsed under rule of law.Unconquered
Building New Institutions
All taluka credit societies in crisis — Sunil co-founded Kukadi Sahakari Patsanstha as MD. Deposits crossed ₹1.5 crore rapidly. Father recently passed away. Life at another crossroads. Yet: “I was never alone. I never will be.”
कुकडी सहकारी पतसंस्था · नवा अध्याय · वडिलांची आठवण
🌳
New Dawn
🌱
The Banyan Grows
Police–society bridge · Cooperative finance · Legal advocacy · Social awakening. Agriculture, Society and Justice — three pillars of a life fully lived. Forward, with full force.Journey Continues
The Warrior’s Scorecard
Battles fought · Victories earned · Lives changed
🏭
₹3500Cr
Sugar Factory Saved
10 years · 17 Writ Petitions · Parner’s lifeline reclaimed for 16,000 members
⚖️
17
Writ Petitions
Became a lawyer himself when 20 senior advocates refused · 5-member legal team built
🚔
20
Cases in 30 Days
Murder contract network dismantled · Key accused externed · Justice delivered fast
📜
1st
Judicial Accountability
First to introduce judicial error accountability in Parner · 3–4 judgments corrected on record
🏦
₹1.5Cr
Cooperative Built
Kukadi Sahakari Patsanstha · MD · Deposits in short span · Financial lifeline for taluka
🌿
₹110Cr
Temple Land Reclaimed
Devsthan trust land recovered · Illegal liquor trade shut · High Court orders enforced
“रांद्रदिन आम्हा युद्धाचा प्रसंग”
— Sant Tukaram Maharaj · The motto of a warrior’s life
The Four Pillars
Philosophical & spiritual foundations
🧘
Swami Vivekananda
Vivek · Fearless wisdom · Strength from within
☸️
Lord Buddha
Nirvikaar shanti · Calm in the storm · Boundless compassion
📜
Dr. B.R. Ambedkar
Constitutional strength · Equality · Justice as a birthright
🕊️
Mother Teresa
“Fix your family first — broken families create society’s problems”VIJAYSUNIL
A Meeting of Two Warriors
Vijay Gaikwad of Takli Dhokeshwar met this fearless AgriCos brother today — heard his extraordinary journey, witnessed his indomitable spirit, and expressed intent to walk together on the path of Agriculture, Society & Justice.
When two purpose-driven people meet — something meaningful always follows.
✦
— विजय गायकवाड, टाकळी ढोकेश्वर
🌾 जय किसान | जय संविधान 📜
माझा जन्म डिकसळ ह्या डिग्रज ऋषींचा वारसा लाभलेल्या, व ज्या महर्षी व्यासांनी महाभारत लिहिले, त्याचे वडील पराशर ऋषी यांच्या पुण्याईने पावन झालेल्या पारनेर तालुक्यात जिथे आदरणीय सेनापती बापट यांचे जन्मस्थान आहे ह्या ठिकाणी झाला वडील mseb अभियंता असल्याने नोकरीनिमित्त जिथे बदली असेल तिकडे असूनही शक्य तितका वेळ घरी देत होते परंतु माझी व घरातील मुलांची जबाबदारी ही माझे आजोबा कोंडिबा रामा चौधरी यांनी घेतली होती कारण चुलते आजोबांसारखे बिनविरोध 15 वर्ष सरपंच त्यामुळे अनायासे ही सर्व ओळखून मुलांना घडवण्याची जबाबदारी आजोबांकडे आली त्यांनी लहानपणापासून शेतातील सर्व कामे करणे, घरात जे नवीन वाहन येईल ते शिकवणे, जगातील व्यवहार मग आठवडे बाजार करणे असो की कोर्ट कचेऱ्या सर्व ठिकाणी मी माझ्या कुटुंबातील पहिल मुल असल्याने मला सोबत नेत वेल ट्रेन्ड केलं इतक की मला कुणाची गरज भासू नये माझी सर्व कामे कुणाच्या मदतीशिवाय मी स्वतः करावीत नॉन वेज खाण्याची आवड त्यांना असल्याने अगदी ते बनवणं सुद्धा त्यांनी शिकवलं आज मी जो काही आहे त्या जडणघडणीतला 70 टक्के वाटा हा आजोबांच्या जडणघडणीतला आहे वडिलांनी हंगे शिवारात 50 एकर जमीन घेतली होती 5 इयत्तेपर्यंत त्याची सगळी मशागत दादा दळवी दगडू शिंदे ह्या ड्रायवर च्या जोडीने आम्ही करत होतो. घरात ब्लास्टिंग मशीन अल तर तेही शिकलो. हंगा तलावात जमीन घेऊन खोदलेल्या विहिरीचे ब्लास्टिंग मी वडील व ड्रायव्हर लोक यांनी करून 5 किमी वरून पाइपलाइन आणून शेती बागायती झाली. त्यामुळे 12 नंतर अनायासे प्रवेश पुण्यात अँग्री कॉलेज ला झाला तिथे एका महाराष्ट्रातील प्रशासनात व निरनिराळ्या क्षेत्रात असणाऱ्या सिनियर मंडळींच्या समावेश होणे हीच आयुष्यभराची ठेव आहे कारण आग्रिकोस स्पिरीट काय असत युनिटी काय असते एक कुटुंब म्हणून राजकारण समाजकारण प्रशासन सर्व स्तरात चांगलं माहीत आहे ज्याचा उल्लेख आदरणीय कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांनी mpkv राहुरी येथील दीक्षांत समारंभात मान मुख्यमंत्री देवेंद्रही फडणवीस साहेब यांच्या समोर नुकताच केला अँग्री झाल्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्यू मधून स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सिलेक्शन झालं पण वडिलांची इच्छा मी अधिकारी ह्वाव ही असल्याने ते सोडून देत m. sc अँग्री ला राहुरी येथे प्रवेश घेतला परंतु mpsc जाहिराती रेग्युलेर नसल्याने यूपीएससी तयारी केली अस वाटल होत ही सर्व पार्श्वभूमी असल्याने माझं जीवन सरळ सहज असेल पण खरा जीवनातला ट्विस्ट इथेच आला वडिलांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या त्यानंतर मी कुठेतरी जॉइन ह्वाव ह्या अपेक्षा वाढल्या त्यांची चिडचिड चालू झाली. अशातच चुलते विभक्त झाले.मग भाऊबंदकी सर्व काही दुनियादारी वाट्याला आली इतकी ज्यांना मी आर्थिक मदत केली त्यांनी माझ्याच पैशातून माझ्या हत्येच्या सुपाऱ्या देण्यापर्यंत मजल गेली मग मी ते रॅकेट आपले अँग्री कॉस सिनियर IPS अभिनव देशमुख सर व इतर पोलिस दलातील अधिकारी माझे सिनियर यांच्या मदतीने एका महिन्यात तब्बल 20 गुन्हे दाखल करून संपवलं नुकतेच त्यातील मूळ आरोपीला नगर जिल्हा तडीपार केले आहे.हे सर्व होत असताना करोना काळात पुणे सोडून घरी याव लागलं जस इकडे आलो तसा वडिलांचा आजारपणाचा त्रास व जगाचा त्रास आणखी वाढला परंतु आजवरची जडणघडण agricos चे सदैव पाठबळ यावर सर्व प्रसंग निभावून नेले अन्यथा आजवर जिवंत असतो की नाही मला शंका आहे. तरीही स्वप्नांचा पाठपुरावा सोडला नाही. गावाकडे लोकजागृती सामाजिक संस्था या मित्रांच्या संस्थेशी संपर्क आला तिथे कार्यरत झालो तालुक्यातील साखर कारखाना परत घेण्याचा लढा चालू झाला 10 वर्षात 17 रीट पीटिशन दाखल करून पारनेर साखर कारखाना बचाव समिती ही धर्मादाय आयुक्त यांच्याकडे संस्था नोंदणी झाली कारण ही करत असताना locus standi चा मुद्दा निकाली काढायचा होता त्यात मी खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळली. खरा लढा तर पुढेच होता समोरील माणसे पहिली तर 20- 20 वकिलांनी उच्च न्यायालयात आमच्या बाजूने लढण्यास नकार दिला मग ठरवलं आपणच वकील बनू त्यातून आज आमची माझ्यासाहीत 5 जणांची टीम तयार झाली. व आज तो लढा अंतिम टप्यात असून सर्व आरोपींचे जामीन रद्द करत ह्या एवढ्या वर्षांच्या लढ्याला अंतिम यश मिळालं 3500 कोटींची उलाढाल असलेला कारखाना पारनेर तालुक्याची कामधेनू आज परत येईल दरम्यान तत्कालीन महसूल मंत्री यांच्याकडील सुनावणीत ७ /१२ आधीच 16 हजार सभासदांच्या नावे झाला त्यासाठी रात्री अपरात्री मुंबईत जाऊन सकाळी 2 4 वाजता उठून रात्री 2 वाजेपर्यंतचा प्रवास सर्व समितीने केला तिथेही सर्व ऍग्रिकोस सिनियर, वर्गमित्र यांचे सहकार्य लाभले अन्यथा हा जगन्नाथाचा रथ आहे सर्वांचे हातभार लागले नसते तर इतवार आलो नसतो अंती आम्ही फक्त माध्यम आहोत करता करविता ईश्वरी शक्ती हा भाव आहे परंतु त्यातून आम्ही घडलो आणि समर्थ झालो. त्यानंतर हा चालवायचा तर एखादी आर्थिक संस्था आपल्याकडे असावी म्हणुन कुकडी सहकारी पतसंस्थेची स्थापना झाली ज्यात बचाव समिती सभासद संस्थापक व मी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जबाबदारी स्वीकारली. ती चालू करण्यामागे तालुक्यातील सर्व पतसंस्था गोत्यात आल्याने लोकांना एक पर्याय देणं हा हेतू होता ज्याच्या अल्पावधीत 1.5 कोटीपर्यंत ठेवी गेल्या. ज्याचा उद्या वटवृक्ष होईल ह्यात शंका नाही. त्यानंतर तालुक्यातील एका नगरसेवकाने 110 कोटींची देवस्थान जमीन लाटून तिथे अवैध दारूविक्री हॉटेल असे चालू होते उच्च न्यायालयाने आदेशित करूनही अतिक्रमण हटत नव्हते. शेवटी मी विश्वत सदस्य झाल्यानंतर माझे सारे पणाला लावून, सर्व मित्र वरिष्ठ कृषिमित्र प्रशासन यांच्या मदतीने तो लढा पुढे नेला त्या रागातून त्याने माझे मुख्याधिकारी यांच्या केबिन मधून नगरपंचायत पारनेर येथून अपहरण करून जीवे मारण्याच्या पर्यंत केला पण पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेने जीव वाचला. पण हे सर्व होत असताना भीती काय असते हे आजोबांनी कधी शिकवले नाही त्यामुळे माझा स्वभाव निढर आहे हे त्याला कळले नाही व जो तालुका त्याच्या दहशतीला घाबरत होता त्याला पोलिस प्रशासनाने कायद्याचा बालेकिल्ला महिनाभर दाखवल्याने त्याची दहशत संपुष्टात आली अजूनही ह्या गोष्टी आठवल्या की आपण कुठे चाललो होतो कुठे आलो हा विचार कधीतरी मनाला शिवतो पण ह्या सर्व करण्यामागे स्वतःच्या क्षमतेचा योग्य वापर हा प्रामाणिक हेतू होता. त्यातच एका सहकाऱ्याला 302 च्या खोट्या गुन्ह्यात सामाजिक कार्यकर्ते असल्याने रागातून अडकवले गेले तेव्हा कळले की एखाद्या गुन्हेगारावर एखादा गुन्हा जास्त नोंदणी झाला म्हणून फरक पडत नाही परंतु एखाद्या निष्पाप माणसावर जर गुन्हा नोंद झाला तर तो लॉकअप मधून बाहेर आल्यावर पहिल्यासारखा राहत नाही व म्हणून एखाद्या निष्पाप माणसावर गुन्हा नोंद होणार नाही याची खबरदारी पोलिस प्रशासनाने घेण यावर माझा भर असतो म्हणून आजही पोलिस प्रशासन व समाज यांच्यातील दुवा म्हणून काम करतो ती संवेदनशीलता मनाशी जपली आहे. त्यातून हा संघर्ष पुढे नेताना 3 4 न्यायाधीशांच्या न्यायदानातील चूकही माझ्यामार्फत व इतर सदस्यांमार्फत लक्षात आणून देत वर्षानुवर्षांच्या संघर्षाला योग्य मार्गाने घेऊन पुढे चालतो आहोत असे करणारे आम्ही तालुक्यातील पहिले असु कारण न्यायालयीन अकाउंटबिलीटी ही गोष्ट असते तोपर्यंत समाजाला माहीत नव्हती. तेव्हाच संघर्ष न संपणारा आहे ह्याची जाणीव झाली आज सर्व व्यवस्था आपल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिडर प्रमाणे काम करत नाही त्यामुळे आजच्या जगात संघर्षाला पर्याय नाही त्यालाच आजच्या जगात न्याय मिळेल.
ह्या सर्व गोष्टींनी जीवनाला नवीन आयाम दिला. हे सर्व काही आम्ही पडद्याआड करत आहोत घरात वडील आजारी होते त्यामुळे हे सर्व काही मी घरी न सांगता करत होतो उद्देश फक्त स्वतःच्या धाडस हिमतीवर सर्व करण्याची धमक इतकीच अपेक्षा. परंतु सर्वांच्या साथीने हा प्रवास इथवर आला आहे. नुकतेच वडील स्वर्गवासी झाले आयुष्य पुन्हा एका वळणावर उभे आहे परंतु आता मी एकटा नाही कधीच नव्हतो सर्वांची अभेद्य साथ कालही होती आजही आहे उद्याही असेल. इथून पुढे स्वतःच्या पूर्ण ताकदीने शेती, समाजकारण, व ईश्वर ज्या संधी देईल त्या घेत जीवनाला अर्थ देण्याचं काम इथून पुढेही होत राहील. मी कालही ह्या सर्व कामाचे माध्यम होतो आजही आहे उद्याही असेल परंतु त्यामागे ऍग्रिकोस ची प्रचंड ऊर्जा, आणि सहकाऱ्यांची निर्व्याज साथ आहे तीच माझी कमाई आहे मित्र, अँग्री कॉस सिनियर हे प्रेरणा स्थान आहेत राहतील. खूप जणांना वाटत मला समज सेवेची आवड आहे साफ चूक माझ्या वडिलांसारखे, आजोबांसारखे समाजात जगण्याची मला सवय आहे अवतीभोवती सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची, आणि आपल्याला शक्य ते सर्व करत समाजात जगण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे इथून पुढचा प्रवास ह्या बलस्थाने सोबत घेऊन पूर्ण ताकदीने असेल. हे सर्व घेऊन चालताना आदरणीय, स्वामी विवेकानंदांचा विवेक, बुद्धांची निर्विकार शांत वृत्ती, बाबासाहेब आंबेडकरांची संविधान ताकद, मदर तेरेसा यांचे… जर तुम्हाला समाजातील प्रश्न संपवायचे असतील तर स्वतःचे कुटुंब परिपूर्ण ठेवा त्यासाठी कठोर व्हा कारण कुटुंबातून नाकारलेली माणसे पुढे सामाजिक प्रश्न बनतात. व म्हणून आजवर आलेल्या अडचणीत योग्य मार्ग कधी सोडला नाही चुकीला माफी नाही दंडित करण्याचा नियम आहे कारण काळ सोकावतो तो सोकावता कामा नये. शेवटी समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे असार ते सार शोषून घ्यावे निसार ते सार सोडून द्यावे तया नाम श्रवणभक्ती.जग हे जगण्यासाठी कठीण जागा आहे, सोपी नाही, संत तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे रांद्रदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हे दररोज अनुभवतो. कारण जगण्याचा पाया तुकाराम…. म्हणून लोकजागृती सामाजिक संस्था ब्रीदवाक्य आहे, तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळामाथी हनु काठी….. याप्रमाणे इथून पुढचा जीवनप्रवास समाधानाच्या दिशेने असेल…. अंती ह्या जगाला निधड्या छातीने अखेरचा हा तुला दंडवत म्हणून मृत्यूला आनंदाने सामोरे जाण्यापर्यंत…
भेट एका निधड्या योद्ध्याची… एक जिद्द, एक संघर्ष, एक प्रेरणा! Sunil Chaudhari
पारनेर तालुक्याच्या कुशीत वाढलेला, डिकसळच्या पवित्र मातीत बालपण घालवलेला, महर्षी पराशर ऋषींच्या पुण्यभूमीत जन्मलेला — सुनील चौधरी — हे नाव नाही, एक जिवंत महाकाव्य आहे.
मातीतून घडलेला माणूस
आजोबा कोंडिबा रामा चौधरी — बिनविरोध १५ वर्षे सरपंच. या माणसाने नातवाला फक्त शेती नाही शिकवली, तर जगणे शिकवले. आठवडे बाजार असो की कोर्ट-कचेऱ्या, ब्लास्टिंग मशीन असो की स्वयंपाकघर — “कुणाची गरज न लागणे” हा संस्कार त्यांनी खोलवर रुजवला. हंगा तलावाच्या शेतात ५ किलोमीटर पाइपलाइन आणून बागायती शेती उभी केलेल्या या घराण्याचे रक्त सुनीलच्या शिरात आहे — आणि ते दिसतेही!
अँग्रिकॉस — आयुष्याची खरी विद्यापीठ
पुण्याच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश झाला आणि मिळाली अँग्रिकॉस बिरादरी — महाराष्ट्राच्या प्रशासन, राजकारण, समाजकारण सर्व स्तरांवर पसरलेली ही एकता म्हणजे आयुष्याची खरी शिदोरी. नुकतेच कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांनी MPKV राहुरी येथील दीक्षांत समारंभात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर या अँग्रिकॉस स्पिरिटचा गौरवाने उल्लेख केला — हे सांगणे पुरेसे आहे!
जेव्हा जीवन कसोटीला लागले…
SBI मध्ये कॅम्पस सिलेक्शन झाले, पण वडिलांची इच्छा — “मुलगा अधिकारी व्हावा.” ते सोडले, M.Sc. Agriculture साठी राहुरी गाठले. MPSC-UPSC ची तयारी सुरू झाली — आणि तेव्हाच नियतीने कठोर वळण दाखवले. **वडिलांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या.** घरावर आभाळ कोसळले. चुलत्यांनी विभक्त व्हायचे ठरवले. भाऊबंदकीचे घाव बसले. ज्यांना आर्थिक मदत केली त्यांनीच पैशांतून **हत्येच्या सुपाऱ्या** द्यायला मागे-पुढे पाहिले नाही!
पण सुनील डगमगला नाही. अँग्रिकॉस सिनियर IPS अभिनव देशमुख सर आणि पोलिस दलातील सहकाऱ्यांच्या मदतीने एका महिन्यात तब्बल २० गुन्हे दाखल करून ते रॅकेट संपवले. मूळ आरोपीला नगर जिल्हा तडीपार केले.
न्यायालयीन रणांगण — दशकभराचा एकाकी संग्राम
येथेच सुनीलचा खरा अवतार उभा राहिला.
पारनेर तालुक्याची कामधेनू— ३५०० कोटींची उलाढाल असलेला साखर कारखाना — बुडवला गेला होता. १० वर्षे, १७ रिट पिटिशन्स— हा आकडा वाचताना थक्क व्हायला होते. पण त्यापेक्षा मोठे दुखणे होते ते म्हणजे २०-२० वकिलांनी उच्च न्यायालयात लढण्यास नकार दिला!
तेव्हा सुनीलने ठरवले — “आपणच वकील बनू.”
आज त्यांची ५ जणांची कायदेशीर टीम तयार आहे. जामीन रद्द होत आहेत. पारनेर साखर कारखाना बचाव समिती धर्मादाय आयुक्तांकडे नोंदली गेली आहे. Locus Standi चा कायदेशीर अडथळा दूर केला गेला आहे. तत्कालीन महसूल मंत्र्यांकडे रात्री-अपरात्री मुंबईत धाव घेत रात्री २ वाजता पोहोचून, पहाटे ४ वाजता परत निघत — १६ हजार सभासदांच्या नावे ७/१२ मिळवला!
हे सर्व करताना ३-४ न्यायाधीशांच्या न्यायदानातील चुकाही योग्य मार्गाने लक्षात आणून दिल्या — Judicial Accountability हा शब्द तालुक्याला पहिल्यांदा कळवला तो सुनीलमुळे!
देवस्थान जमीन आणि अपहरणाचा प्रसंग
११० कोटींची देवस्थान जमीन लाटून तेथे अवैध दारूविक्री सुरू होती. उच्च न्यायालयाचे आदेशही झुगारले जात होते. सुनील विश्वस्त सदस्य झाले आणि प्रशासनाच्या साथीने अतिक्रमण हटवण्यासाठी जीव ओतला. त्या रागातून **नगरपंचायत पारनेर येथील मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमधूनच अपहरण करण्याचा प्रयत्न झाला — जीवे मारण्याची धमकी मिळाली.**
पण पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेने जीव वाचला. आजोबांनी भीती शिकवलीच नव्हती — त्यामुळे या प्रसंगातही सुनील ताठ उभा राहिला. तालुक्याच्या दहशतीचे साम्राज्य कायद्याच्या बळावर संपुष्टात आले.
कुकडी सहकारी पतसंस्था — पर्यायी आर्थिक विश्व
तालुक्यातील सर्व पतसंस्था संकटात असताना लोकांना दिलासा देण्यासाठी कुकडी सहकारी पतसंस्था** स्थापन केली. Managing Director म्हणून जबाबदारी घेतली. अल्पावधीतच १.५ कोटींपर्यंत ठेवी** जमा झाल्या. हा वटवृक्ष आणखी विस्तारेल यात शंका नाही.
वडील गेले… पण सुनील थांबला नाही
हे सर्व रणसंग्राम सुरू असताना घरात वडील गंभीर आजारी होते. हे सारे त्यांना न सांगता, स्वतःच्या हिमतीवर लढत राहिले. नुकतेच वडील स्वर्गवासी झाले — जगणे पुन्हा एका वळणावर आले. पण सुनील म्हणतो, “मी एकटा नाही, कधीच नव्हतो!”
आज विजय गायकवाड यांची भेट
आज विजय गायकवाड, टाकळी ढोकेश्वरयांनी या निधड्या छातीच्या, संघर्षशील अँग्रिकॉस बांधवाची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांचा हा अद्भुत जीवनप्रवास जाणून घेतला आणि भविष्यात शेती, समाज व न्यायाच्या लढ्यात एकत्र येण्याचा मनोदय व्यक्त केला.
जेव्हा दोन संघर्षशील माणसे एकत्र येतात — तेव्हा इतिहास घडतो!
“रांद्रदिन आम्हा युद्धाचा प्रसंग”— संत तुकाराम महाराज
अशा लढवय्या, निर्भय, समाजनिष्ठ बांधवाला सलाम…
#SunilChaudhary#AgriCos#ParnaSugarFactory#JudicialAccountability#SocialFighter#Maharashtra#KrishiParva#VijayGaikwad#TakliDhokeshwar#संघर्ष#न्याय#शेती
जय किसान | जय संविधान ![]()
— विजय गायकवाड, टाकळी ढोकेश्वर

