The Trap of Deceptive Success Stories
(स्वतःच्या डोक्याचा वापर न करणाऱ्यांना हे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं….) (This needs to be said again and again to those who don’t use their own heads…)
— महारुद्र मंगनाळे | Mahrudra Mangnale
शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या आल्या की, सोशल मीडियावर शेतीतील यशकथांचा महापूर येतो. कोणीतरी आयटीची नोकरी सोडून शेती करू लागला आणि करोडोचं उत्पन्न काढतोय. कोणीतरी परदेशातील सुखवस्तू जीवन सोडून भारतात येतो, नवा प्रयोग करतो आणि वर्षाकाठी करोडो रुपयांची कमाई करू लागतो. सेंद्रिय शेती, भाजीपाला, टाकावू पदार्थांपासून लाखो मिळवण्याच्या बातम्या आणि व्हिडीओ सगळीकडे दिसू लागतात. मी गेल्या वर्षभरापासून बारकाईने बघतोय — हे आपोआप घडत नाही. हे पद्धतशीरपणे कोणीतरी घडवतंय.
Whenever news of farmer suicides surfaces, social media is flooded with agricultural success stories. Someone quit their IT job and is now earning crores from farming. Someone else left a comfortable life abroad, returned to India, tried a new experiment, and is raking in millions annually. Stories and videos pour in — organic farming, vegetables, agricultural waste — all earning lakhs. I have been watching this closely for the past year. This doesn’t happen on its own. Someone is orchestrating this systematically.
एका बाजूला शेतकरी आत्महत्यांची संख्या सातत्याने वाढत असताना, शेतीतील लाखो-करोडो रुपये कमाईच्या यशकथा कशा काय सोशल मीडियावर दिसू लागतात? मी मुद्दाम अशा कथा वाचतो, बघतो — आणि त्यातील खोटारडेपणा सहजपणे माझ्या लक्षात येतो. या फसवणूक कथा कोण समोर आणतंय? कशासाठी?
बारकाईने विचार केला तर — वाढत्या शेतकरी आत्महत्यांचे गांभीर्य कमी करणे हा मुख्य हेतू दिसतो. शिवाय, हे वाचून नवे-नवे भाबडे लोक शेतीत येतात, प्रयोग करतात आणि हमखास बुडतात. नव्या लोकांना शेतीत ओढून त्यांना देशोधडीला लावणे — हाही एक फायद्याचा धंदा आहे. शेतकरी बुडतो, पण मालाची लूट करणारी साखळी मालामाल होते.
On one hand, farmer suicides are rising steadily. On the other, how do stories of crores earned through farming suddenly flood social media? I deliberately read and watch such stories — and the dishonesty in them becomes apparent quite easily. Who is bringing these fraudulent stories forward? Why?
If you think carefully, the primary motive is to downplay the seriousness of rising farmer suicides. These stories lure new, unsuspecting people into farming — and they almost certainly fail. Bringing naive people into farming and ruining them is itself a profitable racket. The farmer sinks, but the chain that plunders agricultural produce grows rich.

शेतकरी बुडाल्यानंतर कोणाचं तरी अनुकरण करून फसल्याचं तो उघडपणे सांगूही शकत नाही. कोणताही नवा प्रयोग करायला लाखो रुपयांची गुंतवणूक लागते. त्याचे लाभधारक अनेक असतात. लुटारूंना शेतकऱ्यांच्या भल्या-बुऱ्याशी काही देणंघेणं नसतं. शेतकऱ्यांच्या मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणं आणि ही साखळी जगवणं हे सरकारचं अधिकृत धोरण असल्याने, अशा बोगस यशकथा हा त्यांचा अधिकृत सापळा आहे.
या यशकथावाले शेतकरी उच्चशिक्षित, निवृत्त सनदी अधिकारी, आयटीवाले, फॉरेन रिटर्न असतात. साहजिकच बहुतेकांना वाटतं — शेतीत यश फक्त अशाच बुद्धिमान माणसांना मिळू शकते. मग जे कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात, त्यांच्याबद्दलचा निष्कर्ष काढला जातो — “ते लायक नव्हते.” एकदा हे समाजमनावर बिंबलं की, शेतकरी आत्महत्यांबद्दलची संवेदना आपोआप बोथट होते. “रोजचंच मढं, त्याला कोण रडं” — असा दृष्टिकोन बनतो. शेतकऱ्यांच्या शत्रूंनी ही समाजभावना घडवण्यात यश मिळवलं आहे.
A farmer who fails after blindly following someone else’s example cannot even openly say so. Any new farming experiment demands an investment of lakhs — with many beneficiaries. The exploiters have no concern for the farmer’s welfare. Keeping this chain alive is, in effect, the government’s unofficial policy — and these bogus success stories are its official trap.
These success-story farmers are highly educated — retired IAS officers, IT professionals, NRIs. Naturally, most people conclude that only such minds can succeed in farming. Those who die by suicide under debt are then labelled as simply “not capable.” Once this belief is planted, society’s sensitivity toward farmer suicides dulls automatically. The public attitude becomes: “It’s a daily occurrence — who weeps for it?” The enemies of farmers have succeeded in shaping this social sentiment.
मी ज्या आनंददायी शेतीचा पुरस्कार करतो, त्यात मोठी कमाई होण्याची सुतराम शक्यता नाही. ती फक्त पोट भरू शकते, जगण्याचा आनंद देऊ शकते. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि मातीशी नाळ जुळलेली आहे, तेच असी शेती करू शकतात. ज्यांना कोरडवाहू शेतीतून पैसे कमवायचे आहेत, त्यांनी शेतीत अजिबात येऊ नये — हे मी वारंवार सांगतो.
The kind of joyful farming I advocate holds virtually no possibility of large earnings. It can only fill one’s stomach and offer the joy of living. Only those who are financially stable and deeply connected to the soil can pursue such farming. I have said this repeatedly: those who wish to earn money from dryland farming should not enter farming at all.
स्वतःचा अनुभव | Personal Experience
अधिक उत्पन्न काढायला शेती ओलिताखाली आणायला हवी म्हणून शेतकरी विंधनविहिरींवर लाखो खर्च करतात — पुरेसं पाणी मिळत नाही, लागलेलं टिकत नाही, आणि कर्जाच्या खाईतून बाहेर पडणं अशक्य होतं. दहा कर्जबाजारी शेतकऱ्यांपैकी पाच याच कारणाने बुडालेले असतात.
मी स्वतः तीन वर्षांपूर्वी चार विंधनविहिरी घेतल्या. एकाला अर्धा इंच पाणी लागलं, हजार फुटाची पाईपलाईन टाकली — चार दिवसांत बोअर बंद पडला. मग मोह टाळून ४२ लाख लिटर क्षमतेचं शेततळं केलं. आज दुष्काळातही आमची फळबाग टिकून आहे.
Farmers spend lakhs on borewells to bring land under irrigation — only to find insufficient water that doesn’t last. Five out of ten indebted farmers have exactly this story.
Three years ago, I drilled four borewells myself. One gave half an inch of water — I laid a thousand-foot pipeline, and the borewell dried up in four days. I resisted further temptation and built a farm pond with 42 lakh litre capacity instead. Today, even in drought conditions, our small orchard survives because of it.
प्रयोग १ : मत्स्यपालन | Experiment 1: Fish Farming
शेततळं भरल्यानंतर फेसबुकवर फोटो टाकले — “मत्स्यपालन करा” असे अनेक सल्ले आले. यूट्यूब व्हिडीओ बघून इच्छा प्रबळ झाली. नरेश शिंदेला बोललो — तो अनुकूल होता. अहिल्यानगरहून मत्स्यबीज, जाळी आणि खाद्य आणलं — सुमारे २३-२४ हजार रुपये खर्च. १३,००० मत्स्यबीज तळ्यात सोडलं. दररोज खाद्य टाकणं, मासे बघणं हा आनंददायी दिनक्रम बनला.
आठ महिने उलटले — माशांची वाढ अपेक्षेप्रमाणे नाही. अचानक बेडकांचा सुळसुळाट. दहाव्या महिन्यात मच्छीमाराला बोलावलं — पाच तासांत केवळ दोन-तीन किलो मासे सापडले. १३,००० मासे गेले कुठे? बेडकांनी पिल्लं खाल्ली असा निष्कर्ष. एकूण खर्च — ₹६०,०००. एकही मासा खायला मिळाला नाही.
पण तळ्यातील मासे जवळून पाहण्याचा आनंद ६० हजारांपेक्षा अधिक मोलाचा होता — असं मानून मी त्याचं दुःख केलं नाही.
After posting photos of the filled pond on Facebook, many suggested fish farming. YouTube videos made the idea irresistible. I bought fish seed, nets, and feed from Ahmednagar — around ₹23,000–24,000. We released 13,000 fish. Feeding them daily became a joyful routine.
Eight months passed — the fish weren’t growing as expected. Frogs mysteriously invaded the pond. In the tenth month, a fisherman found just two to three kilos after five hours. Where did 13,000 fish go? The frogs had eaten the baby fish. Total expenditure: ₹60,000. Not a single fish reached our plate.
But I told myself: watching those fish up close was worth more than sixty thousand rupees — and I made peace with the loss.
प्रयोग २ : हिरवी मिरची | Experiment 2: Green Chilli
नरेश शिंदेच्या आग्रहाखातर मल्चिंग पेपर वापरून पहिल्यांदा मिरची लावली. नरेश आणि गजाननने भरपूर मेहनत घेतली. दोन-तीन सल्लागार बदलले, औषध दुकानदार बदलले — पण बोकडा काही गेला नाही. विक्री : ₹७,०००-८,०००. खर्च : ₹६०,०००-६५,००० — मजुरी वगळून.
At Naresh Shinde’s insistence, we grew chillies using mulching paper. They worked tirelessly, changed advisors and medicine suppliers — but the pest wouldn’t go. Sales: ₹7,000–8,000. Expenditure: ₹60,000–65,000 — not counting labour.
निष्कर्ष | Conclusion
शंभरातील पाच-सहाजणच मत्स्यपालनात पैसे कमावू शकतात. कुठल्याही पिकाबाबत दुसऱ्याचे अनुकरण केले तरी, तोच अनुभव दुसऱ्याला मिळेल याची खात्री शेतीत देता येत नाही. माझा नियम आता ठरला आहे — जास्तीत जास्त दहा हजार रुपयांचं नुकसान होईल एवढाच प्रयोग करायचा. त्यापेक्षा जास्त नाही.
शेतीत जास्त पैसे मिळत नाहीत हे माहीत असताना, इतरांचे अनुकरण करून मनःस्वास्थ्य आणि आर्थिक गणित बिघडवायचे नाही. मातीशी नाळ जोडून, निसर्गपूरक आनंददायी शेती करायची — यात आनंदच आनंद आहे. सध्या याला पर्याय नाही.
Only five or six out of a hundred can make money from fish farming. With any crop, imitating another farmer gives no guarantee of the same result. My rule is now fixed: attempt only experiments where the maximum loss is ₹10,000. Nothing more.
When you already know that farming will not yield large profits, don’t disturb your peace of mind by blindly imitating others. Stay rooted to the soil, do your nature-friendly, joyful farming. There is happiness in it — pure happiness. For now, there is no alternative.
— महारुद्र मंगनाळे | Mahrudra Mangnale

